सीएए आणि एनआरसीसाठी वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद , विविध संघटनांचा पाठिंबा, राज्यात चोख पोलीस बंदोबस्त

Advertisements
Advertisements
Spread the love

सीएए  आणि एनआररसी  विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. सीएए  आणि एनआररसी  बरोबरच, देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्याचे  आवाहन भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांनीही बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाराष्ट्र बंदमध्ये ५० हून अधिक संघटना सहभागी होणार  आहे.  वंचित बहुजन आघाडीने  पुकरालेल्या या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरात मोठा पोलीस बंदोबस्त, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंदला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा.

Advertisements

वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी बंद सरकारच्या शिक्षण विभागाकडून सहकार्य मिळावे, यासाठी वंचित आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी निवेदन दिलं आहे. सीएए आणि एनआररसी विरोधात राज्यभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या बंदला हे विद्यार्थी पाठिंबा देण्यार असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisements
Advertisements

राज्यातील  ओला-अबर, रिक्षा संघटना, बँकांचे युनियन, एसटी महामंडळ, तसंच वाहतूक संघटनांना बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर असल्फा परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी बस अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बंदला राज्यातून किती पाठिंबा मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज, शुक्रवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. बंददरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन व पोलिस सज्ज झाले आहे.

देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी १६ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आपलं सरकार