धक्कादायक : लेबर कॉन्ट्रॅक्टरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न , पती-पत्नी अटकेत , एक फरार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरात पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूखंडाच्या व्यवहारातून एका व्यावसायिकांच्या कार्यालयात घुसून तीन जणांनी व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील विश्रांतीनगर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून एक जण फरार आहे.

Advertisements

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी कि , शेषराव शेंगुळे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचे विश्रांतीनगर भागात कार्यालय आहे. शेंगुळे आणि गजानन जाधव यांच्यात भूखंड विक्रीवरून वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी शेंगुळे हे त्यांच्या कार्यालयात बसले असताना गजानन जाधव त्यांची पत्नी स्वाती आणि मेहुणा पप्पू सूर्यवंशी हे कार्यालयात आले व त्यांनी शेंगुळे यांच्या अंगावर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल टाकून त्यांना कार्यालयातच जिवंत जाळले. नंतर आरोपी तिथून पसार झाले. शेंगुळे हे आरडाओरड करीत बाहेर आले नागरिकांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. अशाच परिस्थितीत त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी गजानन जाधव व त्याची पत्नी स्वातीला अटक केली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या हल्ल्यात शेंगुळे हे गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार