निर्भया अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींची पुन्हा पतियाळा कोर्टात याचिका , १ फेब्रुवारीचे डेथ वॉरंट जैसे थे ….

Advertisements
Advertisements
Spread the love

येत्या १ फेब्रुवारी रोजी निर्भया प्रकरणातल्या सर्व दोषींची फाशीची शिक्षा आता अटळ असली तरी  शिक्षेची अंमलबजावणी काही दिवसांवर येवून ठेपली असताना ३ आरोपींनी पुन्हा एकदा दिल्लीतल्या पातियाळा कोर्टात याचिका दाखल केली असल्याचे वृत्त आहे. आरोपींचे वकील ए.पी. सिंह यांनी तिहार जेल प्रशासनावर आरोपींना आवश्यक ती सर्व कागदपत्र दिली नाहीत असा आरोप केला आहे. आपल्याला आरोपींना भेटूही दिलं जात नाही असा आरोपही सिंह यांनी केला आहे. या प्रकरणातले आरोपी पवन, अक्षय आणि विनय यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Advertisements

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश कुमार यांचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर अखेर आता दोषींना फाशी देण्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. १ फेब्रुवारीला निर्भयाच्या ४ आरोपींना फाशी देण्यासंदर्भात डेथ वॉरंटही जारी केले असून १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता नराधमांना फाशी देण्यात येणार आहे.पटियाला हाऊस कोर्टाने हि नवीन तारीख जाहीर केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार हे अरोरा खटल्यातील दोषी मुकेश कुमार सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करीत होते.

Advertisements
Advertisements

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांची तडकाफडकी बदली

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना डेथ वॉरंट जारी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. न्य़ायाधीश अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. न्यायाधीश सतीश अरोरा यांनी दिल्लीत 2012 साली झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील गुन्हेगारांविरोधात काही दिवसांपूर्वी डेथ वॉरंट जारी केले होते.

आता आरोपींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल. पटियाला हाऊस कोर्टाने नवीन तारीख जाहीर केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार हे अरोरा खटल्यातील दोषी मुकेश कुमार सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करीत होते आणि फाशीची तारीख २२ जानेवारीपासून पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करीत होते. यापूर्वी, तिहार जेल अधिकाऱ्यांनी निर्भया प्रकरणातील चार दोषींवर फाशीची शिक्षा परत देण्याची मागणी दिल्ली कोर्टाकडे केली होती. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपी फाशीची तारीख २२ जानेवारीपासून पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करीत होते. यापूर्वी, तिहार जेल अधिकाऱ्यांनी निर्भया प्रकरणातील चार दोषींवर फाशीची शिक्षा परत देण्याची मागणी दिल्ली कोर्टाकडे केली होती.

आपलं सरकार