प्रकाश महाजन, हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे यांच्यासह शहरातील नेते आज करणार मनसेत प्रवेश

Advertisements
Advertisements
Spread the love

सध्या राज्यात झालेल्या नवीन सत्ता समिकरणामुळे शिवसेना-भाजपमधील नाराज गट आता मनसेच्या झेंड्याखाली दिसणार आहे. शहरातील सेनेचे आजी-माजी दहा ते बारा नगरसेवक मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे सेनेमध्ये दुफळी निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मनसेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे प्रकाश महाजन 7वर्षा नंतर आता पुन्हा मनसेत प्रवेश घेऊन सक्रिय होत आहेत. तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव व शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख तथा माजी शहरप्रमुख सुहास दाशरथे यांनी नुकतीच राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेऊन पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २३ जानेवारी रोजी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे हे त्यांची भुमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
तत्पुर्वी गेल्या सहा महिन्यांपासून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. मनसेतून बाहेर पडलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन, गंगापुरचे भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांचा निर्णय पक्का आहे. तर पैठणचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण हे पुन्हा मनसेत सक्रिय झाले आहेत, ते देखील लवकरच मनसेच्या झेंड्याखाली दिसणार आहेत.

Advertisements

मोर्चेबांधणीसाठी यांनी केले प्रयत्न…

Advertisements
Advertisements

गंगापूरचे भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील आणि प्रकाश महाजन यांच्याशी मनसे चित्रपट सेनेचे राज्य उपाध्यक्ष आशिष सुरडकर यांचे नजीकचे संबंध आहेत, तसेच मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे देखील नजीकचे संबंध आहेत. जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून उमेदवारी लढवत तीन लाखांवर मते घेतली होती. मनसे नेते अभिजीत पानसे यांची दाशरथे जुनी मैत्री आहे याशिवाय राज्य उपाध्यक्ष जावेद शेख, उपशहराध्यक्ष गजन पाटील यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीसाठी कृष्णकुंज व प्रवेश करणारे नेते यांच्यात पुला चे काम निभावल्याचे समजते.
आज राज्यव्यापी अधिवेशन…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात आले असून, सकाळी ९ वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. मनसेच्या नवीन झेंड्याचे अनावरण होणार आहे. या अधिवेशनासाठी शहर व जिल्ह्यातील १२०० पदाधिकाऱ्यांचा जत्था मुंबईला गेला आहे.


 

आपलं सरकार