Aurangabad : मनपाची परवानगी न घेता झाडे तोडणा-यांवर पोलिसात गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : महानगरपालिकेच्या जागेवरील बाभळीचे झाड तोडणा-यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ११.४० वाजेच्या दरम्यान मुकुंदवाडीतील तोरणागड परिसरात घडली.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उद्यान अधिक्षक विजय पाटील यांना तोरणागड परिसरतील महापालीकेच्या जागेवरील बाभळीचे झाड तोडण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे विजय पाटील, उद्यानातील कर्मचारी हरीभाऊ घोडके, कंत्राटी सुपरवायझर आनंद साळवे यांनी तोरणागड गाठले असता तेथे बाभळीचे झाड मुळासकट तोडल्याचे निदर्शनास आले. तसेच लोक टेम्पो क्रमांक (एमएच-४२-एम-२९९५) मध्ये तोडलेल्या झाडाची लाकडे भरतांना दिसली. त्यामुळे पाटील व त्यांच्यासहकारी त्यांचा फोटो घेत असतांना त्यांनी तेथुन धूम ठोकली. याप्रकरणी उद्यान विभागाचे कृषी सहाय्यक देविदास रुस्तूम निंबाळकर (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टेम्पोचालकासह अज्ञात व्यक्तींवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात विनापरवानगी झाड तोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आपलं सरकार