Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad आरटीओच्या सहाय्यक अधिका-यांविरूध्द गुन्हा दाखल, परराज्यातील ट्रकची शहरात विक्री प्रकरण

Spread the love

औरंंंगाबाद : मिझोराम येथून चोरून आणलेल्या ट्रकची औरंगाबादेत विक्री होवून त्याची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने आरटीओ कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारीसह संबंधीत विभागाच्या लिपीकांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री झिरो ने गुन्हा दाखल होऊन तोवेदांतनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अशी माहिती वेदांतनगर पोलिसांनी दिली.

वेदांतनगर पोलिस ठाण्याची सी.सी.टी.एन.एस.यंत्रणा खराब असल्यामुळे वरील गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.अशी माहिती पोलिसांनी दिली
गेल्या वर्षी ट्रक चोरी करून त्यावर बनावट चेसीस क्रमांक व इंजीन क्रमांक टाकून  विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला होता. त्यातच काही महिन्यापूर्वी आरटीओ कार्यालयात चोरीच्या ट्रकची नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी चौकशी सुरू केली आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने आरटीओ कार्यालयात मिझोरम राज्यातून आणलेल्या पाच ट्रकच्या क्रमांकाची माहिती देवून त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या.

आरटीओ कार्यालयातील एका सहाय्यक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यांना गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्या अधिका-याची तब्बल तीन तास गुन्हेशाखा पोलिसांनी चौकशी केली. तसेच आरटीओ कार्यालयात परराज्यातील पाच ट्रकची नोंदणी करण्यात आल्याची कागदपत्रे आरटीओतील लिपीकाने पोलिसांपुढे सादर केली. दरम्यान, शुक्रवारी एका ट्रकच्या नोंदणी संदर्भातील कागदपत्रे तपास कामासाठी देण्यात यावीत असा पत्रव्यवहार पोलिसांनी आरटीओ कार्यालयाशी केला असल्याची माहिती सुत्रांनी सांगितली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!