Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : “जीडीपी” पाठोपाठ लोकशाहीच्या जागतिक यादीत भारताची ५१ व्या स्थानावर घसरण…

Spread the love

जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळख असणाऱ्या भारताची विकास दरापाठोपाठ (जीडीपी ) जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार लोकशाही सूचकांकाच्या जागतिक क्रमावारीत दहाव्या स्थानी असलेला भारत थेट  ५१व्या स्थानी गेला आहे. ‘द इकनॉमिस्ट इंटेलिजन्ट्स यूनिट’ने (ईआययू) २०१९ साठीचा हा अहवाल जारी केला असून त्यात भारतातील लोकशाही सदोष असल्याचे  म्हटले  आहे. भारतात नागरी स्वातंत्र्यामध्येही घसरण झाल्याचा दावा ईआययूने केला आहे.

दरवर्षी ईआययूकडून हा अहवाल जारी करण्यात येतो. या संस्थेकडून १६५ स्वतंत्र देश आणि दोन क्षेत्रातील लोकशाहीची सद्यस्थितीचा अभ्यास करूनच अहवाल जारी करण्यात येतो. यंदा जारी करण्यात आलेल्या अहवालात भारताचं लोकशाही सूचकांकामधील स्थान दहाव्या स्थानावरून ५१ व्या स्थानावर घसरले  आहे. देशातील नागरिक स्वातंत्र्याच्या ऱ्हासामुळे भारताची हि घसरण झाल्याचे  या अहवालात नमूद करण्यात आले  आहे. यादीनुसार २०१८ मध्ये भारताचे एकूण अंक ७.२३ एवढे होते. ते घसरून ६.९० एवढे झाले आहेत.

हा सूचकांक  निवडणूक प्रक्रिया, सरकारचं कामकाज, राजकीय भागिदारी, राजकीय संस्कृती आणि नागरिक स्वातंत्र्य आदी मुद्द्यांवरआधारित असतो. या शिवाय चार प्रकारच्या शासन व्यवस्थेनुसार गुण दिले जातात. पूर्ण लोकशाहीसाठी एकूण ८ गुण दिले जातात. तर त्रुटीपूर्ण लोकशाहीसाठी ६ पेक्षा जास्त आणि ८ पेक्षा कमी गुण दिले जातात. मिश्र शासन व्यवस्थेसाठी ४ पेक्षा अधिक आणि ६ पेक्षा कमी गुण दिले जातात. सत्तावादी शासनला ४ किंवा त्यापेक्षा कमी गुण दिले जातात. यंदा भारताचा समावेश त्रुटीपूर्ण लोकशाहीमध्ये करण्यात आला आहे. या यादीत चीन १५३व्या स्थानी असून वैश्विक रँकिंगमध्ये चीन सर्वात खालच्या स्तरावर आहे. तर विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या ब्राझिलने या यादीत ५२वं स्थान पटकावलं आहे. तर रशिया १३४व्या स्थानी असून पाकिस्तानला १०८व्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. श्रीलंका ६९व्या, बांगलादेश ८० व्या आणि उत्तर कोरिया १६७ व्या स्थानी असून नॉर्वे सर्वोच्च स्थानी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!