Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : ट्रॅक्टरचे भाडे थकवून शेतकर्‍याला लावला ४ लाख ८० हजारांना चुना

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागसेननगरातील शेतकर्‍याला ४ लाख ८० हजारांना गंडवल्याचा गुन्हा ऊस्मानपुरा पोलिसठाण्यात दाखल झाला आहे.
नरेंद्र भाऊसिंग आडे(६०) रा.शहानेरवाडी असे या आरोपीचे  नाव आहे. नागसेननगरातील शेतकरी रमेश येडूबा साळवे(५०) यांचे ट्रॅक्टर भाडेतत्वावर गेल्या २३जानेवारी २०१९ रोजी १५ हजार रु.प्रतिमास या दराने घेऊन दुसर्‍याला वापरण्यास दिले व वर्षभरापासून साळवे यांना किरायाचे पैशे देण्याची टाळाटाळ करंत होता. यामुळे वैतागलेल्या साळवे यांनी ऊस्मानपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद देताच आडेवर फसवणूकीचा गून्हा दाखल झाला आहे. सदर आरोपी आपण एका पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याच्या बतावण्या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले,  आडे याचे असे अनेक फसवणूकीचे प्रकार  उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानपुरा पोलिस करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!