Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चलनातून बाद झालेल्या २५ लाख ८० हजार रूपयांच्या नोटा पकडल्या, गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : चलनातून बाद केलेल्या नोटा २५ हजार रूपये कमीशन घेवून बदलून देणा-या तीन जणांच्या मुसक्या गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. परंतु कोर्टाने तिन्ही आरोपींना जामिनावर सोडले. या तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी भारतीय चलनातून २०१६ साली बाद करण्यात आलेल्या ५०० व १ हजार रूपये किमतीच्या  २५ लाख ८० हजार रूपये किमतीच्या  नोटा जप्त केल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मिना मकवाना यांनी मंगळवारी (दि.२१) दिली.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख उमर शेख गुलाम नबी (वय ३७, रा.रेणूकामाता मंदिराजवळ, जाधववाडी), शेख मोईन शेख मुनीर (वय ३५, रा.कांचनवाडी), सैय्यद अझहरूद्दीन सैय्यद अहेमद (वय ३७, रा.बायजीपुरा) हे तिघे चलनातून बाद झालेल्या नोटा २५ हजार रूपये कमीशन घेवून बदलून देणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गौतम वाव्हळे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, रामदास गायकवाड, जमादार सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रविंद्र खरात, आनंद वाहुळ आदींच्या पथकाने कटकटगेट परिसरात सापळा रचून रिक्षा क्रमांक (एमएच-२०-बीटी-९७६०)मधून  आलेल्या तिघांना ताब्यात घेतले.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता, त्यातून २५ लाख ८० हजार रूपये किमतीच्या  चलनातून बाद झालेल्या नोटा मिळून आल्या. पोलिस उपायुक्त मिना मकवाना, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वाव्हळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!