नांदेड जिल्ह्यात चार शिक्षकांनी केला सहावीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार , गुरु -शिष्य परंपरेला काळिमा फासणारी घटना

Spread the love

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी शंकर नगर येथील साईबाबा विद्यालयात शिकते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर आहे. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या घटनेची पोलिसांना  माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत.

नांदेडमधील शंकरनगरमध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांनीच तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. पीडित विद्यार्थिनीला एक व्हिडीओ दाखवण्याचा बहाणा करत एका खोलीत नेण्यात आलं. तिथे अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मुलीन घरी गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मुलीची प्रकृती नाजूक असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

संतापजनक बाब  म्हणजे, मुलीच्या आईने मुख्याध्यापकांकडे तक्रार करुनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याऊलट या घटनेची वाच्यता कुठेही करु नये यासाठी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेण्यात आलं अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. कुटुंबीयांना विश्वासात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपलं सरकार