Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संजय राऊत , इंदिरा गांधी आणि करीम लाला यावर “हे” मत दिले शरद पवार यांनी ….

Spread the love

सध्या चर्चेत असलेल्या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी म्हटले आहे कि , ‘संजय राऊत यांच्या स्टेटमेंटपासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. पण इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतं, असं आमचं मत आहे. त्यांनी ते विधान मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला आहे.’  नाशिक येथील एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारल्यावर त्यांनी आपले हे मत दिले.

या विषयावर बोलताना ते पुढे  म्हणाले, ‘सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. सगळेच काही माहिती नसतात. महंमद अली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असंही वादळ उठलं होतं. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती.’ अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये अशी सूचना आपण नेत्यांना करणार नाही. कारण सर्व शहाणे आहेत. सरकार ५ वर्ष चालवायचं आहे. काँग्रेस व्यवहारी आहे, असंही त्यांनी सांगितलं. तीन पक्षांचं सरकार करतांना आम्ही काही निर्णय घेतले. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण ठरवलं. शेती पुनर्बांधणीसंदर्भातलं धोरण ठरवलं. या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!