Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडले, रामनगरजवळ भीषण अपघात अपघातानंतर बसचालक पसार

Spread the love

खासगी कंपनी कामगारांची वाहतूक करणा-या बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रामनगरातील सह्याद्री हॉस्पीटलसमोर घडली. या भीषण अपघातात ललीता शंकर ढगे (वय ३९, रा.कासलीवाल पूर्व, चिकलठाणा विमानतळासमोर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालकाने बससह घटनास्थळावरून धुम ठोकल्याची माहिती मुकुंदवाडी  पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीता ढगे या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी जिमसाठी गेल्या होत्या. जिममधुन ललीता ढगे या आपल्या दुचाकीवरून घराकडे परत जात असतांना रामनगरातील सह्याद्री हॉस्पीटलसमोर त्यांच्या दुचाकीच्या चाकात रस्त्यावर पडलेले वायर अडकल्याने त्यांचा तोल जावून त्या खाली पडल्या. नेमक्या त्याच वेळेस चिकलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे जात असलेल्या कंपनी कामगारांची वाहतूक करणा-या खासगी बसचे चाक ललीता ढगे यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर बसचालकाने बससह घटनास्थळावरून धुम ठोकली.
या अपघाताची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांसह ललीता ढगे यांचे पती शंकर विठ्ठल ढगे (वय ४४) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ललीता ढगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!