Aurangabad Crime ताजी बातमी : पाच बायकांचा दादला असलेल्या शौकीन घरफोड्याला अखेर पकडलेच ….

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – ३० डिसेंबर ला घरफोडी करुन २ जानेवारी २०२० रोजी इंदोरहून बायकोच्या स्टेट बॅंक आॅफ इंडीया आणि बॅंक आॅफ इंडीया च्या खात्यात टाकलेले१४लाख रु. पोलिसांनी सीझ केल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे या सय्यद सिकंदरच्या पाच बायका असल्याची माहिती असून हा घरफोड्या असलेला आधुनिक सिकंदर आपल्या प्रत्येक बायकोला महिन्याला २० हजाराची तजवीज करीत असल्याची अफलातून माहिती पोलिसांना मिळाली.

Advertisements

रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी सय्यद सिकंदरला पुंडलिकनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने  नगर आणि पुण्याच्या मधे तो  ऊसाच्या शेतात पळून जातांना पकडण्यात यश मिळविले. पुंडलिक नगरचे पोलीस कर्मचारी डोईफोडे, दिपक जाधव,सांगळे, चौरे, रवि जाधव यांनी हि कारवाई केली.


सय्यद  सिकंदर शेख इम्रान (३४) रा.बीड असे चोरट्याचे नाव असून याने ३० डिसेंबर २०१९ला. पुंडलिकनगर पोलिसठाण्याच्या हद्दीत निवृत्त सिव्हील सर्जन डाॅ.नामदेव कलवणे यांचे घरफोडून ७७ तोळे सोने व ४ लाख ७० हजार रु. रोख लंपास केली होती.या गुन्ह्यातील सर्व आरोपी निष्पन्न झाले आहेत.

Advertisements
Advertisements

घरफोडी केल्याची माहिती खबर्‍याने पोलिसांना दिली.पण ही खबर खरी कशी आहे याची पडताळणी करण्याकरता आरोपी सिकंदर च्या नगर येथील बायकोला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर तिला सिकंदरला फोन लावण्यास सांगितले.सिकंदर बायकोशी बोलंत असतांना मधेच पोलिसांचा आवाज ऐकून दचकला व आपण शरण येत असल्याची थाप मारुन फोन बंद केला. त्यानंतर सिकंदरने इंदोरहून तिच्या खात्यात जमा केल्याची खात्री होताच पोलिस तपास त्या दिशेने सुरु झाला.

सिकंदरला विविध धर्माच्या एकूण ५ बायका असून प्रत्येकीला महिन्याला २० हजार रु.घरखर्चाला देतो. त्यापैकी जालना, औरंगाबाद, नगर, बीड.येथील बायका निष्पन्न झाल्या आहेत.जालन्याला आशा राहते, औरंगाबादला फातेमा,नगरला रेश्मा व बीड आणि अन्य एका ठिकाणच्या बायकोचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना लागला नाही.या संपूर्ण कारवाईचे श्रेय पुंडलिकनगर पोलिसांचे असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.या प्रकरणाचा तपास एपीआय घन्नशाम सोनवणे करंत आहेत.

आपलं सरकार