Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ठरले : १ फेब्रुवारीला आरोपींना दिली जाणार फाशी , निर्भया प्रकरणात राष्ट्रपतींनी आरोपी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज फेटाळला

Spread the love

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषी मुकेश सिंह याने केलेला दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे  मुकेश सिंह याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंतीही  सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती.

या आरोपींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. न्यायालयाने याबाबत फ्रेश वॉरंट जारी केले आहे. निर्भयाच्या आरोपींची फाशी पुढे ढकलल्याने आणि तारीख निश्चित होत नसल्याने निराभायच्या आईने तीव्र नाराजी व्यक्त करीत ” जे आरोपींना हवे आहे तेच होत आहे. तारीख पे तारीख , तारीख पे तारीख , आमची व्यवस्थाच अशी झाली आहे कि , येथे आरोपींचेच ऐकले जाते. ” त्यांनतर न्यायालयाची आरोपींना फाशी देण्याची बातमी आली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवरील सुनावणीत पतियाळा हाऊस कोर्टाने  म्हटले की, या प्रकरणीतील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही .  दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. हे लक्षात घेता फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरणार आहे. तुरुंग प्रशासनाने आज (शुक्रवार) कोर्टाला स्टेटस रिपोर्ट द्यावा लागणार आहे.

दरम्यान दिल्ली सरकारने काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. या प्रकरणातील चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय पतियाळा हाऊस कोर्टाने दिला. त्यासाठी कोर्टाने ७ जानेवारीला डेथ वॉरंट जारी केला होता. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता. तुरुंग प्रशासनाने १७ जानेवारीपर्यंत फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती द्यावी,असे आदेश दिल्ली कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला दिले होते.. तुरुंग प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असं कोर्टाने म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!