Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अंधेरीतील थ्री स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी उघडकीस आणले सेक्स रॅकेट , मराठी अभिनेत्रींसह तीन मुलींची केली सुटका

Spread the love

मुंबई पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकून गुरुवारी रात्री उशीरा आणखी एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणले असून पोलिसांनी तीन मुलींची सुटका केली आहे. यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना याबाबत वेस्टीन हॉटेलमधून टीप मिळाली होती की, प्रिया शर्मा नावाची एक महिला एजंट मुंबईतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये मुली पुरवण्याचे काम करत आहे. त्यानुसार रात्री उशीरा पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. अटक करण्यात आलेल्या प्रिया शर्मा ही कांदिवली पूर्व येथे विनायक नावाची टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी चालवते. अशी माहिती मिळाली आहे. तसेच ती बॉलीवूडमधील अभिनेत्री पुरवण्याचे काम करते.

मुंबईतील गोरेगाव परिसरातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गेल्याच  आठवड्यात  पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक केली होती. सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूड कनेक्शनमुळे खळबळ उडाली आहे. समतानगर येथील सीनिअर इन्स्पेक्टर राजूबाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मध्यरात्री गोरेगाव पूर्वेतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा मारला. खबऱ्याद्वारे पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांमधील एका कर्मचाऱ्याने ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला.

या कारवाईत पोलिसांनी सेक्स रॅकेटसाठी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणीला अटक केली. नंतर ही तरुणी बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ‘सेक्स रॅकेटप्रकरणी ३२ वर्षीय आणि २६ वर्षीय तरुणींना अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावर याबाबत गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे,’ अशी माहिती पोलीस अधिकारी धर्नेंद्र कांबळे यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक जण बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाची गर्लफ्रेंड असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!