दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेले देवेंद्र सिंग यांच्या चौकशीवर राहुल गांधी यांचे प्रश्नचिन्ह

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेला पोलीस अधिकारी देवेंद्र सिंगच्या चौकशीवरून  केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एनआयए’कडे तपास सोपवून देवेंद्र सिंगला ‘शांत’ बसवू पाहत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी ट्विट करत पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दहशतवादी देवेंद्र सिंगला पुढील चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे. देवेंद्रने शांत बसावे, यासाठीच हे प्रकरण एनआयएकडे देण्यात आले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

Advertisements

एनआयए प्रमुख योगेश मोदी हे सध्या एनआयएचे प्रमुख आहेत. त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या एनआयए देवेंद्र सिंग प्रकरणी योग्य तपास करतील का सवाल राहुल यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गठीत झालेल्या एसआयटीच्या प्रमुखपदी योगेश मोदी यांची नेमणूक करण्यात आली होती.

Advertisements
Advertisements

गुजरातमध्ये झालेल्या २००२ मधील दंगल प्रकरणाचा तपास एसआयटीने केला होता. नरोदा पाटीया नरसंहार, गुलबर्गा सोसायटी नरसंहार आणि गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग नसल्याचे सांगत एसआयटीने क्लिन चीट दिली. त्याशिवाय गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील गृहमंत्री हरेन पांड्या हत्येच्या तपास सीबीआयने केला होता. त्यावेळी योगेश मोदी यांच्या नेतृत्वात हा तपास झाला होता. गुजरात हायकोर्टाने या तपासावर ताशेरे ओढले होते. सीबीआयने अटक केलेल्या १२ आरोपींना गुजरात हायकोर्टाने २०११ मध्ये निर्दोष म्हणून मुक्तता केली होती. त्यानंतर या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. सुप्रीम कोर्टाने २०१९ मध्ये या हायकोर्टाचा निकाल रद्द करत आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.

आपलं सरकार