Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खा. संजय राऊत यांच्या दिलगिरीनंतरही काँग्रेस नेत्यांकडून राऊतांवर टीकास्त्र

Spread the love

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही या विषयावरील प्रतिक्रिया थांबलेल्या नाहीत. हा विषय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. दरम्यान या विषयावरून मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही सेनेला इशारा देताना म्हटले आहे कि , इंदिरा गांधी आमच्यासाठी पूजनीय आहेत, त्यांच्याबाबत कोणी काहीही बोललं तर खपवून घेणार नाही, ‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं’, असं सणसणीत उत्तर नितीन राऊत यांनी संजय राऊतांना दिलंय.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधाने केली आहेत. स्व. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही. महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.

Posted by Ashok Chavan on Thursday, January 16, 2020

महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना तारतम्य बाळगा – अशोक चव्हाण

महाविकास आघाडीतील मंत्री आणि माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधानं केली आहेत. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला. तसंच. महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असं आवाहनही चव्हाण यांनी केलं.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत माफिया डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी आक्षेप घेताच अवघ्या दोन तासांत संजय राऊत यांनी दिवंगत इंदिरा गांधींबद्दलचे वक्तव्य मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. याआधी संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते.

संजय राऊतांची दिलगिरी..

दरम्यान इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च नेत्या होता. प्रभावशाली नेत्या, प्रखर राष्ट्राभिमानी नेत्या. आमच्याकडून इंदिरा गांधी यांची प्रतिमा भंग होईल, असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शायरने महाराष्ट्राचे मनोरंजन करणे चांगले राहील, अशा शब्दांत संजय निरुपम यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!