Aurangabad Crime : चौक्याजवळ आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पहाटे बेड्या,ग्रामीण गुन्हेशाखेची कारवाई

Spread the love

औरंगाबाद – चौक्याजवळ सावंगी टोल नाक्याच्या बाजूला चार दरोडेखोरांच्या टोळीला आज(गुरुवार) पहाटे ५वा.पाठलाग करुन पकडले.त्यांच्या ताब्यातून ट्रकसहित दरोड्याचे २लाख ३५ हजारांचे सामान जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिराजखान अब्दुलखान,शाहरुख अख्तरशहा,शे.सलमान शे.कैसर सर्व रा.हर्सूल तर चौथा नेवासखान अरबाजखान रा.अमोवा जि.महाराजपुर उत्तर प्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.सर्व रेकाॅर्डवरचे गुन्हेगार असून या टोळीकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.अशी माहिती ग्रामीण गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.
वरील कारवाईत पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलंत, संदीप सोळंके,पोलिस कर्मचारी सफी झिया, विठ्ठल राख, विक्रम देशमुख , गणेश मुळे, संजय देवरे यांनी सहभाग नोंदवला होता.

आपलं सरकार