Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या , जाणून घ्या कोणाची पोस्टिंग कुठे ?

Spread the love

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच नव्या सरकारने राज्यातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात मुख्य पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात दुय्यम पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे .  मंत्रालयाच्या प्रशासन विभागाने जरी केलेल्या बदल्यांच्या  यादीनुत  मुंबई महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्यासह मुंबईतील इतर काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. तसेच, काही अधिकाऱ्यांची मुंबईतच  बदली करण्यात आली आहे. मुंबई पालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची पुण्यात समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बदल्यांची यादी पुढील प्रमाणे…

१. श्रीमती जे. मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे

२. एस. ए. तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव, वस्त्रोद्योग म्हणून करण्यात आली आहे

३. डॉ. के. एच. गोविंदराज, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

४. बी. वेणुगोपाल रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने या ठिकाणी करण्यात आली आहे.

५. राजीव जलोटा, आयुक्त, विक्रीकर, यांची बदली अपर मुख्य सचिव, ग्रामविकास या पदावर झाली आहे.

६. संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त, विक्रीकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई पदावर करण्यात आली आहे.

७. असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव, ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव, ऊर्जा या पदावर झाली आहे.

८. शैला ए. विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई पदावर करण्यात आली.

९. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या ठिकाणी झाली आहे.

१०. दीपक सिंगला, आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली पदावर करण्यात आली आहे.

११. डी. पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांची बदली महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई पदावर झाली आहे.

१२. मिलिंद शंभरकर, आयुक्त, समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर पदी करण्यात आली आहे.

१३. आर. बी. भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण या ठिकाणी झाली आहे.

१४. नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची नियुक्ती आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे इथे झाली आहे.

१५. मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर बदली

१६. मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर पदावर नियुक्ती

१७. डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे या पदावर नियक्ती

१८. आर एस जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर या पदावर करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!