Aurangabad Crime : स्वयंघोषीत भविष्यकार देशपांडे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : फुलंब्री  तालुक्यातील चौका येथे राहणा-या ३७ वर्षीय महिलेच्या पतीला दुर्धर आजारपणातून तंत्रविद्याने बरा करतो म्हणून वेळोवेळी पैसे उकळणा-या स्वयंघोषीत भविष्यकार अनंत देशपांडे यांच्या विरोधात फसवणूक आणि जादूटोना प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश जाफ्राबाद  येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अरुण आर. व्यवहारे यांनी दिले. या आदेशान्वये  जाफ्राबाद पोलीस ठाण्यात देशपांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलंब्री तालुक्यातील चौका येथे राहणा-या ३७ वर्षीय मंगला विलास सोनवणे यांचे पती गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असताना देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारत होत नसल्यामुळे त्या पतीला घेऊन जाफ्राबाद येथील भविष्यकार अनंत देशपांडे यांच्याकडे गेले. देशपांडे यांनी त्याला पाहिल्यानंतर मी विलास सोनवणे यांना तंत्रविद्याने बरा करू शकतो घाबरू नका असे अमिष दाखवत विलासची पत्नी मंगला यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्यांना ३५ हजार रुपयास गंडविले.
मंगला सोनवणे यांनी भविष्यकार अनंत देशपांडे यांनी पैसे घेतल्यानंतर देखील सुरळीत उपचार केले नाही माझी फसवणूक केली असल्याची तक्रार जाफ्राबाद पोलीस ठाण्यात दिली. तक्रार दिल्यानंतरही गुन्ह्याची नोंद करण्यात न आल्यामुळे मंगला सोनवणे यांनी अ‍ॅड. विष्णू यादव पाटील यांच्या मार्पâत जाप्रâाबाद येथील न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अरुण व्यवहार यांच्या समोर सुनावणी झाली असता त्यांनी तक्रारीची दखल घेऊन त्याचा तपास करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

Advertisements

आपलं सरकार