धक्कादायक : अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल, १४ वर्षीय मुलाविरुद्ध तक्रार देणे महिलेला पडले महागात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

अल्पवयीन मुलींपासून ते महिलांवरील बलात्काराच्या , लैंगिक छळाच्या बातम्या नेहमीच्याच आहेत . पण हरयाणामध्ये एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर २९ वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली असून, प्रकरणी संबंधित  महिलेवर पलवल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

या प्रकरणी तपास आधिकारी अंजू देवी यांच्या हवाल्यानं ‘एएनआय’ने हे वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे कि , २९ वर्षीय महिलेनं सप्टेंबर २०१९ मध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या महिलेच्या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. पण अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलाची नंतर न्यायालयानं या गुन्ह्यातून मुक्तता केली. त्याचबरोबर मुलगा अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयानं २९ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पूर्ण तपासाअंती , रविवारी पलवल पोलीस ठाण्यात त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisements
Advertisements

या  बाबतच्या स्थानिक वर्तमानपत्रांच्या माहितीनुसार, सदर २९ वर्षीय महिला गर्भवती राहिली होती. त्यावेळी त्या महिलेनं एका मुलावर बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. न्यायालयात सुनावणीदरम्यान महिलेनं ज्याचाविरोधात तक्रार केली तो मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलेय की, दहा वर्षांपूर्वी माझं लग्न झाले असून, चार वर्षापूर्वी पतीचं निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर मी पलवलमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहायला आले. तिथे एका युवकाबरोबर माझी ओळख झाली. ओळखीनंतर त्या तरूणाचं माझ्या घरी येणं-जाणं वाढलं. त्या मुलानं मला लग्नाचे आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही एकत्र राहू लागलो. तरूणासोबत अनेकवेळा शरीरिक संबंध झाले. महिला गर्भवती झाल्यानंतर तरूणानं लग्नाला नकार दिला. त्यानंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आता या महिलेवरच आता बलात्काराचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

आपलं सरकार