स्टेट बँकेसह अनेक बँकांच्या एटीएमवर मिळतील आता या १० सुविधा , स्टेट बँक ग्राहकांनी दुर्लक्ष करू नये अशा दोन सूचना

Advertisements
Advertisements
Spread the love

आतापर्यंत  एटीएम कार्ड होल्डर आपल्या एटीएम कार्डचा वापर फक्त पैसे काढणे आणि बॅलेंस चेक करण्यासाठी किंवा फार फार तर पैसे ट्रांसफर करण्यासाठी करीत होते परंतु आता स्टेट बँकेसह अनेक बँकांनी एटीएम कार्डावर अनेक महत्वपूर्ण सुविधा दिल्याने अनेक महत्त्वाची कामे तुम्हाला तुमच्या एटीएममधून करता येणार असल्याचे वृत्त आहे. आता या कामासाठी कोणत्याही ग्राहकाला बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नाही.  त्यामुळे ज्या कामांसाठी बँकेच्या शाखेत जावून  ग्राहकांना तासनतास रांगेत उभे  राहवे  लागतं होते  ते काम एटीएमवर दिलेल्या सुविधांमुळे काही मिनिटात होणार आहे.  एफडीपासून ते टॅक्सचे पैसे डिपॉझिट करण्यापर्यंतच्या अशा १० सुविधा बँकांकडून एटीएमवर उपलब्ध होणार आहेत.

Advertisements

( 1) टॅक्स भरणा : सध्या हि सुविधा  इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होती  किंवा थर्ड  पार्टी वेबसाईटवरून टॅक्सच्या भरणा करण्यात येत होता. मात्र आता  आयकर टॅक्स एटीएमच्या माध्यमातून भरता येणार आहे. यामध्ये  ऍडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, रेग्युलर असेसमेंट नंतर देण्यात येणारा टॅक्स एटीएममधून भरता येणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला आधी वेबसाईट ब्रांचमध्ये स्वत: जावून नोंदणी करावी लागेल. त्यानंतरएटीएमच्या माध्यमातून टॅक्स भरता येईल. तुमच्या खात्यातून टॅक्सचे पैसे कट झाल्यानंतर एक सीआयएन नंबर येईल.  टॅक्स जमा झाल्यानंतर  २४ तासात वेबसाइटमधून सीआयएनच्यामाध्यमातून चलान प्रिंट केले जाऊ शकते.

Advertisements
Advertisements

(2) FD काढता येणार : एटीएमच्या माध्यमतून ग्राहकांना एफडीसुद्धा काढता येणार आहे. एटीएमच्या माध्यमातून स्क्रीनच्या मेन्यूवर एफडीचे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला एफडी काढता येणार आहे. यातून तुम्हाला किती रक्मेची आणि किती कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट करायचे याचे ऑप्शन मिळेल. त्यानतंर कन्फर्म केल्यावर तुमची एफडी होईल.

(3) पॉलिसीचा प्रिमियम : एटीएमच्या माध्यमातून इंशोरन्स पॉलिसीचा प्रिमियमही भरता येणार आहे. त्यासाठी सर्वच बँकांनी LIC, HDFC लाईफ, SBI लाईफ सारख्या विमा कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. या तीन कंपनीच्या पॉलिसीची रक्कम ग्राहक ATMच्या माध्यमातून करू शकतात. ATM वर तुम्हाला बिल पे सेक्शन ऑप्शन येईल. त्यानंतर ज्या कंपनीची पॉलिसी आहे त्या कंपनीचं नाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुमची जन्म तारीख किंवा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम टाकून कन्फर्म केल्यास तुमची पॉलिसी भरली जाईल.

(4)  पर्सनल लोनची सुविधा : तुम्हाला आता पर्सनल लोन घेण्यासाठीही  बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. तुमच्या एटीएममधून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे. एटीएममधून पर्सनल लोनसाठी अप्लाय करता येईल. एटीएमच्या माध्यमातून लोन देण्यासाठी बँक तुमच्या खात्यातील व्यवहार तपासले जातात . तुमच्या खात्यातील बॅलेंस पाहिले जाते. पगाराची रक्कम आणि क्रेडिट/ डेबिड कार्डवरील रीपेमेंटचा रेकॉर्ड तपासला जातो. त्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन मिळते.

(5)पैशांचे ट्रान्सफर  : ATMचा वापर करून एका खात्यातून दुसऱ्यांच्या खात्यात रक्कम सहज जमा करता येणार आहे.  त्यासाठी ग्राहकांना  ज्या खात्यात पैसे पाठवायचे आहे त्या खात्याची बँके शाखेत जावून किंवा ऑनलाईन नोंदण करावी लागेल. एटीएममधून एका वेळी ४० हजार रुपये पाठवता येणार आहे. दिवसभरात अनेकदा पैसे पाठवण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

(6) कॅश डिपॉझिट सुविधा : देशभरातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांच्या एटीएमसोबत कॅश डिपॉझिट मशीन ठेवली आहे. त्या माध्यमातून ग्राहक आपल्या खात्यात पैसे जमा करू शकतात. एका वेळी ४९ हजार ९०० रुपये जमा करता येतात. मशीनमध्ये २०००, ५००, १००, ५० रुपयाच्या नोटा जमा करता येणार आहे.

(7)बिल भरता येणार : एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना  सर्व प्रकारचे बील भरता येणार आहे. टेलीफोन बिल, वीज बिल आणि गॅस बिलासह इतर बिल भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या साईटवर जाऊन एकदा नोंदणी करावी लागेल.

(8) मोबाइल रीचार्ज : आता तुम्हाला ग्राहकांना  मोबाईल रिचार्ज सुद्धा एटीएमच्या माध्यमातून करता येणार आहे. कोणत्याही शाखेच्या एटीएममध्ये जावून रिचार्ज ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तुमच्या प्रिपेड मोबाईल रिचार्ज करता येणार आहे.

(9)  डोनेशन देता येणार : ग्राहकांना जर कोणत्याही मंदिराला आणि संस्थेला  दान करायचं असेल तर तेही एटीएमच्या माध्यमातून करता येणार आहे.  स्टेट बँकेच्या एटीएममधून ग्राहकांना  अनेक देवस्थानाला दान देता येणार आहे. तशी सुविधाहि एटीएममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(10) चेक बुक विनंती : याशिवाय ग्राहकांना चेक बुकसाठी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुमच्या एटीएममध्ये चेक बुक रिक्वेस्टचं ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर चेक बुक येणार आहे.


स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी : तुम्ही हे केले आहे काय ? 

स्टेट बँकेच्या ग्राहकांनी मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलला असेल तर ही दोन्ही प्रकारची माहिती तुम्ही तुमच्या बँक खात्यात अपडेट करणे  आवश्यक आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती अपडेट केली तर बँक खात्याशी संबंधित व्यवहारांबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्याचबरोबर बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांपासून तुम्हाला खबरदारी घेता येईल.

नव्या नियमानुसार बँक रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई मेल आयडीवर OTP, पिन अॅक्टिव्हेशन मेसेज अशी माहिती शेअर करते. तुमच्या बँक खात्यात तुमचा मोबाइल नंबर अपडेट नसेल तर तुम्ही रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत १० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू शकणार नाही. स्टेट बँकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. १० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यासाठी ओटीपीची आवश्यकता आहे. आपल्या बँक रेकॉर्डमध्ये मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी अपडेट करण्याच्या सूचना बँकेने मागच्याच आठवड्यात ट्वीट करून दिल्या होत्या.


 

आपलं सरकार