अनुराग कश्यपचे मोदींना थेट चॅलेंज , तुमच्या खानदानीचे जन्माचे दाखले आणि तुमची पदवी दाखवा

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभर नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी , एनपीआर आणि जेएनयू हिंसाचार विरोधात केंद्र सरकारवर टीका केली जातं आहे आणि आंदोलनही  करण्यात  येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी  मोदींच्या शिक्षणासंबंधी प्रश्न चिन्ह उपस्थित करून त्यांना शिक्षण घेतलंय हे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. अनुराग कश्यप यांनी  ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना हा जाहीर प्रश्न विचारला आहे.

Advertisements

अनुरागने यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘आजपासून सीएए कायदा लागू झाला. मोंदीना पहिलं म्हणावं तुमचे कागदपत्र, entire political science ची आपली पदवी दाखवा आणि तुमच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र सगळ्या भारताला दाखवा. त्यानंतर आमच्याकडे मागणी करा’.  ‘सीएए लागू करणारे पंतप्रधानांची entire political science ची पदवी मला पहिला बघायची आहे. मोदींनी शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा. त्यानंतर बातचित करू.’

Advertisements
Advertisements

देशात शुक्रवारपासून  नागरिकत्व सुधारणा  कायदा लागू करण्यात आला. त्यासंबधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे . याशिवाय जेएनयू हिंसाचार प्रकरणातील हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील ओळख पटली आहे. सोमवारपासून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.

 

आपलं सरकार