दोन मित्र , सोबत बियर प्यायले आणि महागडी कार घेण्याच्या उद्देशाने त्याचाच गळा आवळला !! का ते पहा…

Advertisements
Advertisements
Spread the love

तेलगू सिनेमा पाहून महागडी कार घेण्याच्या लालसेने एका युवकाने आपल्याच मित्राच्या अपहरण नाट्य रचून  त्याच्या वडिलांकडून ४० लाखाची खंडणी मागितली  आणि ती न मिळाल्याने त्याने मित्राचाच गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह  पुणे विद्यापीठाच्या आवारात फेकून दिल्याची  धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दाक्षिणात्य चित्रपट पाहून युवकाने हा खून केल्याची कबुली भोसरी पोलिसांना दिली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी वय- १७ रा.दापोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, उमर नसीर शेख वय- २१ रा.खडकी असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे. काल रात्री ८ वाजता राहत्या घराजवळील परिसरातून शेख हा सिद्दिकीला घेऊन गेला होता. त्यानंतर दोघे बिअर प्यायले. शेख याने सिद्दीकी च्या घरी फोन करून ४० लाखांची खंडणी मागितली.  परंतु मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने कुटुंबाकडे एवढे पैसे नसल्याचे समजताच शेख याने सिद्दीकी चा गळा आवळून खून केला. आणि त्याचा मृदेह पुणे विद्यापीठाच्या आवारात फेकून दिला. दरम्यान ‘खतरनाक खिलाडी २’हा दाक्षिणात्य चित्रपट पाहून युवकाने हा खून केल्याची कबुली भोसरी पोलिसांना दिली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार