Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ममता बॅनर्जी यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पण आपल्या मुद्द्यावर ममता ठाम

Spread the love

बहुचर्चित वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायद्याला पश्चिम बंगालमध्ये मोठा विरोध असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बंगाल दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट झाली. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर या तीनही मुद्द्यांवर या बैठकीय चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक सुरू असतानाच सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून राजभवनाबाहेर निदर्शने सुरू होती. दोन्ही नेत्यांची ही भेट २० मिनिटे चालली.
सीएए, एनआरसी व एनपीआर याचा आम्ही विरोध करत असून, काही झाले तरी पश्चिम बंगालमध्ये हे लागू केले जाणार नाही, हे निर्णय मागे घ्यावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पष्टपणे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर दिली. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या राज्याच्या हिस्स्याचे २८ हजार कोटी रुपये केंद्राने शक्य तितक्या लवकर द्यावेत, अशी मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सीएए, एनआरसी आणि एनपीआर मुद्द्यांवर तुमचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीला येण्याचे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी तातडीने सीएए विरोधात टीएमसी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी झाल्या.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोलकातामध्ये जागोजागी ‘गो बॅक मोदी’ असे फलक लावून आपला विरोध दर्शवला. पश्चिम बंगालमध्ये सीएएला तीव्र विरोध करण्यात येत असून, काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस राज्याच्या अनेक भागात निदर्शने, आंदोलने करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता पोर्ट ट्रस्टला १५० वर्षे झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान मोदी हावडा येथील रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असलेल्या बेलूर मठाला भेट देणार आहेत. यासह अन्य दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!