Aurangabad : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खा. इम्तियाज जलील आणि माजी खा. चंद्रकांत खिरे यांच्यात का तू -तू , मै -मैं ?

Spread the love

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील तू -तू , मै -मैं अद्याप थांबायला तयार नसून काल मुख्यमंत्र्यांच्या समोरही हा वाद झालाच. फडणवीस सरकारच्या काळातही शेंद्रा एमआयडीसीतील कार्यक्रमाच्या पत्रिकेवर त्यांचा नामोल्लेख टाळला होता त्यावर ज्या भागात कार्यक्रम आहे तो भाग भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघात येत असल्याने तसे करण्यात आल्याचे कारण सांगण्यात आले होते .

दरम्यान काल औरंगाबाद आणि संभाजीनगर या एकाच शहराच्या दोन नावावर शिवसेना आणि एमआयएममच्या नेत्यांमध्ये आज वाद झाला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काल  त्यांनी विभागीय जिल्हावार बैठका घेतल्या. या बैठकीला एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील आणि सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे दोघेही उपस्थित होते. जलील यांनी आपल्या समस्या मांडतांना औरंगाबाद असा उल्लेख करीत आपली समस्या मांडली त्यावर चंद्रकांत खैरे मात्र त्यांना औरंगाबाद नाही तर संभाजीनगर म्हणा असे वारंवार सांगत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादचा उल्लेख आपल्या भाषणात सुद्धा संभाजीनगर असाच उल्लेख केला.

या प्रकरणात खा. इम्तियाज जलील यांना पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, आता त्यांची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे आहेत ते काहीही म्हणू शकतात. त्यांचे “संभाजीनगर” असले तरी माझे  हे “औरंगाबाद”चं राहणार आहे. बैठकीतील इतर महत्वाच्या विषयापेक्षा खा. जलील आणि खैरे यांच्यातील वादाचीच अधिक चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील  यांच्याकडून  नेहमीच एकमेकांवर टीका केली जाते. कुठल्याही एकत्र कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसायलाही त्यांची तयारी नसते. कालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या विभागीय बैठकीत बसण्याच्या जागेवरूनच दोघांमध्ये वादाची ठिकाणी पडली. या बैठकीला लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आमंत्रित होते. मात्र औरंगाबादचे  खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीवर चंद्रकांत खैरे बसले. त्यामुळे नंतर आलेले खासदार इम्तियाज जलील यांना मागच्या दुसऱ्या रांगेत बसावे लागले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात हि बाब आल्यावर त्यांनी जलील यांना बसण्यासाठी खैरे यांच्या बाजूला खुर्ची टाकण्याची सूचना केली.  मात्र  खैरे जागेवरून उठले नाहीत. या विषयी बाहेर आल्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले खुर्चीवर बसण्यावरून आमचे काहीही वाद झाले नाहीत तर  जलील यांनी मात्र त्याची कबुली देत खैरे यांना २० वर्षा पासून त्या खुर्चीवर बसण्याची सवय आहे. त्यामुळे आपण आता खासदार नाहीत याची त्यांना जाणीव होत नाही , त्यामुळे असे घडते अशी खोचक प्रतिक्रिया खा. जलील यांनी दिली. औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रमावरूनही खा. जलील यांचे पत्रिकेत नाव न टाकल्यामुळे मोठा वाद झाला होता.

आपलं सरकार