Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

येत्या सात दिवसात जम्मू -काश्मीर मधील इंटरनेट बंदीचा आढावा घेण्याचे सर्वोच्च न्ययालयाचे आदेश

Spread the love

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर या भागातील इंटरनेटवर बंदी आणली होती. या प्रकरणात झालेल्या सुनावणीत अत्यावश्यक ठिकाणची इंटरनेट बंदी हटवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहे. आगामी सात दिवसांत जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. इंटरनेट वापर हा मूलभूत अधिकार असल्याचे ही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने इंटरनेटवर बंदी घातली होती. दाखल याचिकांवर न्या. रमण्णा यांच्या खंडपीठाने आज निर्देश दिले. राजकारणात हस्तक्षेप करणे आमचा अधिकार नाही. इंटरनेट वापराचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करत अपवाद परिस्थितीतच इंटरनेट बंद ठेवता येऊ शकतील असेही कोर्टाने म्हटले. नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचं संरक्षण झाले पाहिजे असेही खंडपीठाने म्हटले. इंटरनेट बंदीमुळे प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीने हनन झाले असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्यातील रुग्णालये, व्यवसाय आदींसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले कि , काश्मीरमध्ये हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. आपल्याला स्वंतत्रता आणि सुरक्षा यांच्यामध्ये समतोल साधवा लागणार आहे. त्याच बरोबर नागरिकांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. आवश्यकता असेल तेव्हाच इंटरनेट सेवा बंद करायला हवी. इंटरनेटचा वापर हे संविधानातील कलम १९ (१)चा महत्त्वाचा भाग असल्याचा ऐतिहासिक निर्वाळा सुप्रीम कोर्टाने म्हटले. भारतीय दंड विधान कलम १४४ चा वापर हा कोणताही विचार दाबण्यासाठी केला जाऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० हटवण्यात आले. तेव्हापासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काही दिवस लँडलाइन फोन आणि पोस्टपेड मोबाइलवर निर्बंध होते. मात्र, कालांतराने हे निर्बंध हटवण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जम्मू -काश्मीर येथील जनतेला दिलासा मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!