Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मास्टर माईंडला बेड्या ठोकण्यात एसआयटीला यश

Spread the love

देशभर गाजलेल्या पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणात कर्नाटक एसआयटीने मोठी कारवाई केली असून  या प्रकरणातील  मास्टर माईंडला झारखंडमध्ये अटक केली आहे. ऋषिकेश देवाडीकर  असे  या आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एसआयटीने झारखंडमध्ये जाऊन या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.  ऋषिकेश देवडेकरवर गौरी लंकेश यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल नष्ट केल्याचा आरोप आहे. या  आधी अटक केलेल्या अमोल काळेचा हा साथीदार आहे.  ऋषिकेश देवडेकरला उद्या झारखंड कोर्टात हजर करुन बंगळुरूला आणण्यात येईल.

गेल्या  वर्षी ऑगस्ट महिन्यात पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून आणखी एकाला अटक केली होती. सागर लाखे असं या आरोपीचं नाव आहे. बेळगाव जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली . कर्नाटक एसआयटीनं या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. सध्या लाखेला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी सुरू आहे. सागर लाखे हा बेळगावच्या गणेशपूर भागात राहतो. आतापर्यंत गौरी लंकेश हत्या प्रकरणात  १२ जणांना अटक झाली आहे. या आरोपींच्या चौकशीत वारंवार सागर लाखेचं नाव समोर येत होतं. त्यामुळे सागरचा शोध घेत मध्यरात्री एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलं, आणि सकाळी त्याला अटक करण्यात आली. तर अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा सिनियर प्लॅनर होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी २८ ऑगस्टला दिली होती. गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात एकाच दुचाकीचा वापर केला असल्याच्या माहितीवरून कर्नाटक एसआयटी मंगळवारी महाराष्ट्रात गाडीच्या तपासणीसाठी दाखल झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलाने केल्या गेल्याची माहितीही अमोल काळेने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. अमोल काळेने या पिस्तूलला ‘सुदर्शन चक्र’ असं नाव दिलं होतं. श्रीकृष्णाचे शस्त्र म्हणून सुदर्शन चक्र असं नाव दिले असल्याची माहिती अमोल काळेने दिली आहे. त्यामुळे आता या सगळ्या दिग्गजांच्या हत्येच गूढ उकलणार यात काही शंकाच नाही. यासाठी महाराष्ट्र एटीएस, सीबीआय आणि कर्नाटक एसआयटी यांनी तपासाला वेग आणला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!