Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : काय बोलले देवेंद्र फडणवीस राज -भाजपच्या युतीबाबत ?

Spread the love

मनसे प्रमुख राज ठाकरे बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपबरोबर जाणार असल्याची चर्चा जोरावर आहे . याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , मनसेबरोबर आमची सध्या युती नाही. मनसेचा विचार व्यापक नाही. आम्हाला सर्व भाषिक आणि सर्व धर्मियांना सोबत घेऊन जायचं आहे. आमचा विचार व्यापक आहे. मनसेने त्यांचा विचार व्यापक करावा. त्यांची कार्यपद्धती बदलावी. तसे झाल्यास भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील, असे संकेत फडणवीस यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची प्रभादेवी येथील एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली होती. यावेळी राज आणि फडणवीस यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आणि त्यांचे सहकारीही नव्हते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे संकेत दिले.

दरम्यान भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातूनच होत असल्याच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या टीकेवर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस टीका केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालातून भाजपच राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही फारसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे काही लोक दुसऱ्यांच्या घरात मुलगा झाला म्हणून पेढे वाटत आहेत. त्यांनी ते बंद करावं, अशी टीका फडणवीस यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता केली.

भाजपची मुंबईत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्यावर घणघातील हल्ला चढवला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अचानक निवडणुका आल्याने आम्हाला तयारीला वेळ कमी पडला. नाही तर निकाल अजून काही वेगळा लागला असता. आजच्या निकालाने जनता आमच्या पाठिशी आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेत आम्हाला १००हून अधिक जागा मिळाल्या आहेत. या तीन पक्षांपैकी एका पक्षाला ४३, दुसऱ्या पक्षाला ४५ आणि तिसऱ्या पक्षाला ७१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इतरांच्या घरी मुलगा झाला म्हणून काही लोक पेढे वाटत आहेत. त्यांनी ते बंद करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

नागपूरमधील पराभवाचे विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि ,  नागपूरमध्ये मागच्यावेळी आमच्या २१ जागा होत्या. शिवसेनेच्या ८ होत्या. यावेळी आमच्या ६ जागा कमी झाल्या असून सेनेच्या ७ जागा कमी झाल्या आहेत. शिवाय यावेळी आम्ही वेगळे लढलो होतो. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सेटबॅक बसला होता. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेत पाह्यला मिळाला. पण हा मोठा पराभव नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!