Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तामिळनाडूसह महाराष्ट्र काढला पिंजून, चोरीचे ३० मोबाईल जप्त, तीन अटकेत , पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडेंनी राबवली संकल्पना

Spread the love

औरंगाबाद- शहरपोलिस आणि गुन्हेशाखेचे विशेष पथक तयार करुन पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी डिसैंबर २०१९च्या पहिल्या दोन आठवड्यात तामिळनाडूसह महाराष्र्ट पिंजून काढत खरेदीदारांकडून ३०मोबाईल जप्त केले.व तीन आरोपींना अटक करण्याची कारवाई संयुक्त पथकाकडून करवून घेतली. न्यायालयाकडून हे मोबाईल फिर्यादींना परत सूपूर्द करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षभरात शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण ३०मोबाईल चोरीस गेल्याचे गुन्है दाखल आहैत.मोबाईल चोरीस गेल्या चा गुन्हा हा जरी किरकोळ असला तरी त्याच जनमानसातील महत्व ओळखून पोलिस उपायुक्त खाटमोडे यांनी पोलिसांची संयुक्त मोहिम राबवत संयुक्त पथका कडून तामिळनाडूतील वेल्लोर मधून १६पेकी १४ , बुलढाणा जिल्ह्यातून ६, नाशिक मधून ५, मुंबई-ठाणे परिसरातून ४, जालना ४, बीड मधून ५, परभणी आणि हिंगोलीतून प्रत्येकी १ व नांदेड मधून ३मोबाईल जप्त करंत ३ आरोपी अटक केले.

वरील कारवाईत ३१ पोलिस कर्मचारी आणि एक सहाय्यक पोलिस निरीक्षक होते.पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे एपीआय राहूल सूर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली एम वाळूज पोलिस ठाण्याचे पीएसआय सतीश पंडीत, गुन्हेशाखेचे विजय जाधव, एसआय नंदकुमार भंडारे व अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!