Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र केसरीची मनाची गदा नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरकडे , मित्राचाच केला पराभव

Advertisements
Advertisements
Spread the love

यंदाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली आहे. हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर ३-२ ने मात केली. पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहेत. त्यामुळे हा विजय माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही महत्वाचा मानला जात होता.

Advertisements

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पैलवान पुण्याच्या काका पवारांच्या तालमितील आहेत. कालच्या सामन्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे आज नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. पवार यांच्या उपस्थितीतच हा सामना रंगला.

Advertisements
Advertisements

शैलेश  आणि हर्षवर्धन हे एकाच तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. अति बचावात्मक कुस्ती खेळल्यामुळे पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला. दुसऱ्या डावातही दोन्ही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. दुसरा डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावत बरोबरी साधली. मात्र शेवटच्या १-० सेकंदात हर्षवर्धनने निर्णयाक डाव टाकत महत्वाच्या दोन गुणांची कमाई करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

हर्षवर्धन हा नाशिकचा पैलवान आहे. त्याचे वडील शाळेत क्लर्क आहेत. त्याने सुरुवातीला नाशिकच्या बलकवडे आखाड्यात आणि नंतर पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे घेतले. काका पवारांचा शिष्य म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याला मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभवही आहे. आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.

सामना सुरू होताच हर्षवर्धनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत शैलेश शेळकेवर वरचष्मा गाजवला. या चित्तथरारक स्पर्धेत हर्षवर्धनने शैलेशवर ३-२ने मात करत ‘महाराष्ट्र केसरी’पद खिशात घातलं. हर्षवर्धन सदगीर विजयी होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन संपूर्ण मैदानातून त्याची मिरवणूक काढली. तर हर्षवर्धनने विजयी झाल्याबरोबर उपविजेत्या शेळके यांना खांद्यावर घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. दोस्तीत कुस्ती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही असं म्हटलं जातं, याचं दर्शनच या दोन्ही खेळाडूंनी यावेळी कुस्तीप्रेमींना घडवलं. त्यानंतर हर्षवर्धनला शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाळासाहेब लांडगेही उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!