Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

न्यायालयाचा कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात, २ हजाराची लाच घेतांना केली अटक

Spread the love

औरंंंगाबाद : न्यायालयाने निकाली काढलेल्या फौजदारी संचिका अभिलेख कक्षात कोणत्याही त्रृटी न काढता जमा करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच मागणार्‍या न्यायालयाच्या कनिष्ठ लिपीकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.४) रंगेहाथ गजाआड केले. ज्ञानेश्वर सोनाजी गुळस्कर (वय ५३, रा. कोटला कॉलनी) असे अटक केलेल्या लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर गुळस्कर हे जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीला आहेत. तक्रारदार हे जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कार्यालयीन कर्मचारी म्हणून नोकरीला असून न्यायालयाने निकाली काढलेल्या विविध फौजदारी संचिका अभिलेख कक्षात जमा करण्याचे आदेश नुकतेच त्यांना न्यायालयाने दिले होते. सदरील फौजदारी संचिकामध्ये कोणतीही त्रृटी न काढता त्या अभिलेख कक्षात जमा करण्यासाठी गुळस्कर यांनी तक्रारदाराकडे ३ जानेवारी २०२० रोजी २ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अ‍ॅन्टी करप्शन विभागात तक्रार दिली होती.
अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, जमादार विजय ब्राम्हंदे, सुनील पाटील, रवी अंबेकर, केदार कंदे, कपील गाडेकर, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने शनिवारी न्यायालय परिसरात सापळा रचून २ हजाराची लाच स्विकारणार्‍या ज्ञानेश्वर गुळस्कर यांना अटक केली. गुळस्कर यांच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!