Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कंपनीतील कामगारांनी पकडली महिला चोरट्यांची टोळी, पाच जणींकडून ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

औरंंंगाबाद : वाळूज एमआयडीसीमध्ये होणार्‍या चोर्‍यातील आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने आता कंपनी चालकांनीच सुरक्षितेसाठी कंबर कसल्याने शनिवारी (दि.४) सकाळी कंपनीतुन रॉ-मटेरियल्सची चोरी करणार्‍या ५ महिला चोरट्यांना पकडून पोलीस कर्मचार्‍यांच्या स्वाधीन केले. या महिला चोरट्यांकडून ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडुबाई बोकन, मंगलबाई अहिरे (रा.दोघीही रांजणगाव), लंकाबाई पाटोळे, अरुणा कसबे व कमलबाई सरवदे (तिघीही रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत. वाळूज एमआयडीसीतील मेघा इंजिनिअरींग या कंपनीत स्टुल रुम व मशिन केट मशिन असून येथून इतर कंपनींना मटेरिअल सप्लाय करण्यात येतो. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कंपनीत काही महिला घुसल्या होत्या. या महिला कंपनीतील साहित्य चोरी करीत असल्याचे शेजारच्या कंपनीतील स्टाप आणि कामागरांना दिसून आले. शेजारील कंपनीचे सुरक्षारक्षक रमेश हिंगे यांनी ही माहिती कंपनीचे मालक बालाजी पाटील यांना दिली.
माहिती मिळताच पाटील यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. तसेच शेजारच्या कंपनी कोनाईन इंजिनिअरींग कंपनीचे खुसरो बेग व लक्ष्मी इंडस्ट्रिजच्या जोशी यांना माहिती देत पोलिसांना घेऊन येतो तुम्ही माहिला चोरट्यांना पकडून ठेवा अशी विनंती केली. काही वेळातच कंपनी मालक पाटील व पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी कंपनी मालक बालाजी पाटील यांच्या तक्रारीवरुन महिलांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक किरण जाधव हे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!