Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अमोल घुगेच्या हत्येप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल, दोन अटकेत

Spread the love

औरंंंगाबाद : सिडकोतील शिवनेरी कॉलनी परिसरात राहणा-या अमोल नारायण घुगे (वय २२) या युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल घुगे याचा मृतदेह शुक्रवारी अयोध्यानगर परिसरातील उद्यानाजवळील नाल्यात आढळून आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव नाना वानखेडे, सौरव नाना वानखेडे, रितेश उर्फ  विक्की पुसे, शुभम विसपुते, सर्व रा. अयोध्यानगर, सिडको एन-७ अशी अमोल घुगेच्या मारेक-यांची नावे आहेत.वरील पैकी दोघे गौरव वानखेडे आणि शुभम विसपुते यांना सी.सी. टि.व्हि. फुटेज वरुन अटक करण्यात आली.दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे.दोघे मुख्य आरोपीअद्याप फरार आहेत.गुन्हा घडण्यापूर्वी सौरभ चा मयत अमोल ला फोन आला होता.त्यामुळे अमोलने तो सौरभ कडे जात असल्याचे घरी सांगितले होते.अमोलचा खून झाला तेंव्हा तो मयत पावला हे चौघांच्याही लक्षात आले नाही.अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाल्याचे पोलिस उपायुक्त राहूल खाडे यांनी सांगितले.हे चारही आरोपी भुरटे चोर व नशेखोर आहेत.अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.चार वर्षापुर्वी शहरात गाजलेल्या डॉ. चित्रा डकरे (रा. अमरावती) यांची गळा चिरून हत्या केल्या प्रकरणातील आरोपी अमोल घुगे हा ३१ डिसेंबरपासून घरातून बेपत्ता होता. गौरव वानखेडे, सौरव वानखेडे, रितेश उर्फ  विक्री पुसे, शुभम विसपुते यांच्यासोबत अमोल घुगे याचे जुने भांडण होते. त्या भांडणातूनच चौघांनी अमोल घुगे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी अमोल घुगे याची आई कुसूम नारायण घुगे (वय ४३, रा.शिवनेरी कॉलनी, सिडको एन-९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरूध्द खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!