Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डी.एम.आय.सी. लवकर सुरु झाली असती तर जास्त फायदा झाला असता- डाॅ. स्काफर

Spread the love

छायाचित्रात डावीकडून रुपेश कोल्हाळे , उदय विद्व्न्स , एन श्रीराम , कैलास देसाई, कुलथू कुमार , डॉ. डाॅ.स्काफर, उल्हास गवळी , राम  भोगले, गणेश करोडकर, महेंद्र मालुसरे आदी दिसत आहेत.

औरंगाबाद – शेंद्रा परिसरातील दिल्ली मुंबई कॅरिडाॅर औद्योगिक वसाहत लवकर सुरु झाली असती तर हेंड्रेस हाऊजर कंपनीला जास्त फायदा झाला असता अशी खंत एंड्रेस हाऊजर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. बर्न जोसेफ स्काफर यांनी व्यक्त केली. एंड्रेस हाउजर कंपनीच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त डाॅ.स्काफर औरंगाबादेत आले होते.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले की, अमेरिका आणि चीन चे शीत युध्द भारताच्या पथ्यावर पडले असून भारतात व्यापारा मधे १०टक्के वाढ झाली. १९९९ ला औरंगाबादेत एंड्रेस हाऊजर कंपनी सुरु करण्यात आली होती. या कंपनीत इलेक्र्टोमॅग्नेटिक फ्लोमीटर,कोरियोलिस, मास फ्लोमीटर, र्वोटेक्स आणि अट्रासोनिक फ्लोमीटरचे उत्पादन केले जाते. हे मीटर अमेरिका, दक्षिण अफ्रिकेसह जगातल्या १५  देशात पुरवले जातात.अशी माहितीही डाॅ.स्काफर यांनी दिली. वाळूज औद्योगिक परिसरातील या कंपनीमधे ९९ टक्के स्थानिक अधिकारी कर्मचारी आहेत. तसेच कंपनी तर्फे व्होकेशनल एंट्रंस टेस्ट उपक्रमात दहा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कायम स्वरुपी रोजगार उपलब्ध करुन देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जाॅर्ज एंड्रेस आणि लुडविग हाउजर यांनी या कंपनीची  ३ जानेवारी१९३३साली स्थापना केली. स्विझर्लंडच्या रेनाच येथे कंपनीचे व्यवस्थापन कार्य चालते. जगभरात अंदाजे १४ हजार तर औरंगाबादेत १३० कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत.

या पत्रकार परिषदेला कंपनीचे औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष के कुमार. वरिष्ठ अधिकारी विनय चितळे कार्यक्रमाचे समन्वयक किशोर निकम यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!