Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तुम्हाला हे माहित आहे काय ? नव वर्ष दिनी जन्माला आलेल्या बाळात भारत जगात सर्वप्रथम !!

Spread the love

‘युनिसेफ’ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील बाळांच्या जन्माच्या  आकडेवारी नुसार संपूर्ण जगात १ जानेवारी२०२० रोजी जन्म घेतलेल्या बाळांपैकी तब्बल १७ टक्के बालकं भारतात जन्माला आली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे उपलब्ध माहितीनुसार भारतात यंदा सर्वाधिक ‘न्यू इयर बेबीज’चा जन्म झाला आहे . ०१ जानेवारी २०२० रोजी देशात तब्बल ६७ हजार ३८५ बाळांनी जन्म घेतला.  या आकडेवारीनुसार लोकसंख्येत द्वितीय क्रमांकावर असलेल्या भारताने याबाबतीत चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक पटकावला.

एक जानेवारी २०२० या दिवशी चीनमध्ये ४६ हजार २२९ बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात २६ हजार ०३९, पाकिस्तानात १३ हजार ०२०, इंडोनेशियात १३.०२० बालकांचा जन्म झाला. अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्या दिवशी १० हजार ४५२ बाळांना  जन्म घेतला.

जगातील २०२० मधील  पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला. तर युनिसेफच्या नोंदीनुसार एक जानेवारीच्या मुहुर्तावर जन्मलेलं शेवटचं बाळ अमेरिकेतील होतं. विशेष म्हणजे एक जानेवारीचा मुहूर्त गाठत  आपल्या बाळाला ०१.०१.२०२० अशी जन्मतारीख मिळावी म्हणून  काही गर्भवतींनी सिझेरियनचा पर्याय निवडल्याचीही माहिती Most New Year Babies in India दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!