Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कथित मुलीच्या प्रकरणावरून का भडकल्या अनुराधा पौडवाल ?

Spread the love

केरळमधल्या करमाला मोडेक्स नामक एका ४५ वर्षीय महिलेने प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचा खळबळजनक दावा केला असून या बद्दल करलमाला यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी 50 कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. या दाव्यावर अनुराधा पौडवाल या भडकल्या असून केवळ पैसे मिळविण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठीच  या महिलेने हे आरोप केले आहेत.  या महिलेचं मानसिंक संतुलन बिघडलं आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

या विषयी दैनिक भास्करला दिलेल्या प्रतिक्रियेत अनुराधा पौडवाल म्हणाल्या कि , माझ्या कविता या मुलीचा जन्म 1997 सालचा आहे. एखादा कुत्रा भुंकत असेल तर तुम्ही माझ्याकडूनही भुंकण्याची अपेक्षा करू शकत नाही. कोर्टाने नोटीस पाठविण्याच्या कृतीवरही त्यांनी शंका व्यक्त केली. कोर्टाने कुठल्या आधारावर हे प्रकरण दाखल करून घेतलं असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

या प्रकरणी तिरूअनंतरपुरम कोर्टाने पौडवाल यांना नोटीस बजावली असून २७ जानेवारीला कोर्टात हजर राहायला सांगितलं आहे. करमाला यांनी आपल्या वकिलासोबत एक पत्रकार परिषद घेऊन हा मोठा दावा केला आहे . करमाला म्हणाल्या  की, त्या फक्त चार वर्षांच्या होत्या तेव्हा अनुराधा पौडवाल यांनी त्यांना केरळच्या त्यांच्या मित्राच्या हवाली केलं होतं. पोंनाचन आणि अगनेस असं त्यांच्या केरळच्या पालकांचं नाव आहे. ४० वर्षांपूर्वी पौंडवाल दाम्पत्यांनी त्यांना केरळला ठेवलं होतं. त्यांचे वडिल पोंनाचन यांचं ५ वर्षांपूर्वी निधन झालं असून  त्या आधी त्यांनी करमाला यांना खरी परिस्थिती सांगितली होती. अनुराधा पौडवाल या त्या काळात गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये अतिशय व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांनी असं केलं असावं असंही त्यांनी सांगितलं. इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या विषयी अधिक माहिती देताना करमाला यांचे वकील अनिल प्रसाद यांनी म्हणाले  की, करमाला यांना लहानपणापासून आईचं प्रेम मिळालं नाही. त्यांना दु:ख सोसावं लागलं. त्याची भरपाई म्हणून अनुराधा पौडवाल यांनी त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. अनुराधा पौडवाल यांनी करमाला यांचा मुलगी म्हणून स्वीकार करावा. त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही DNA चाचणीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. करमाला यांचे वडील पोंनाचन हे लष्करात होते. त्यांचं पोष्टींग महाराष्ट्रात होतं. त्या काळात त्यांची आणि अनुराधा पौडवाल यांची ओळख झाली होती अशी माहितीही त्यांनी दिली. जेव्हा ही गोष्ट आपल्याला कळाली त्यानंतर आपण अनुराधा पौडवाल यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलल्याचं टाळलं आणि आपला नंबरही ब्लॉक केला असंही त्या म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!