इंदूमिलवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक २०२२ पर्यंत पूर्ण होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक २०२२ पर्यंत पूर्ण केलं जाईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ‘मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पाहावसे वाटेल असे भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन केले होते . आम्हाला राज्य सरकारमध्ये सुदैवाने संधी मिळाली आहे. इतके मोथे स्मारक होत आहे ते पाहावे म्हणून इथे आम्ही आलो. यात काही गोष्टी आहेत मात्र त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. स्मारकाबाबत बऱ्याच परवानग्या मिळाल्या आहेत. काही परवानग्या बाकी आहेत. त्या राज्य सरकारच्या अख्यातरीत आहेत म्हणून काही अडचणी येणार नाहीत,’ असेही स्मारक परिसराला भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , स्मारकासाठी लागणारे पैसे राज्य सरकार देणार असून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर२०२२ पर्यंत स्मारक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. मागची जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही. कुठल्याही परिस्थिती निधी कमी पडणार नाही. काही निर्णय झाले ते ठराविक पद्धतीने झाले मात्र कॅबिनेटमध्ये निर्णय झालेले नाही त्यामुळे आता ते होतील. येत्या १४ एप्रिल २०२२ पर्यंत काम पूर्ण होईल आणि स्मारक सर्वांसाठी खुले होईल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.