Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : सावंगी टोलनाक्याजवळ भरधाव दुचाकी एसटी बसला धडकली, एक जण जागीच ठार

Spread the love

औरंंंगाबाद : भरधाव कार विहिरीत कोसळुन २ तरूण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी (दि.२) भरधाव दुचाकी एसटी बसला धडवूâन एक जण जागीच ठार झाला तर १ जण जखमी झाला. हा अपघात सावंगी टोलनाक्याजवळील माऊंट व्हॅली शाळेसमोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज महेंद्र चौधरी (वय १८, रा. सहारा परिवर्तन, नायगाव रोड, सावंगी) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. गुरूवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या वाजेच्या सुमारास धीरज चौधरी आपल्या मित्रासोबत स्पोर्टस बाईक क्रमांक (एमएच-२०-एफके-५५१९) वरून नायगांवकडे जात होता. माऊंट व्हॅली शाळेसमोर समोरून येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवर चौधरी याची दुचाकी जोराने आदळली. डोक्याला गंभीर मार लागून धीरज चौधरी हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धीरज चौधरी याला उपचारासाठी घाटीत दाख्ला केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी पुâलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!