Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : पोलिस स्थापना दिनानिमित्त साप्ताहिक प्रदर्शनीचे उद्घाटन, क्युआरटी पथकाची थरारक प्रात्याक्षीके

Spread the love

औरंंंगाबाद : पोलिस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन गुरूवारी (दि.२) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्युआरटी कमांडो पथकाने थरारक प्रात्याक्षीके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर झालेल्या स्थापना दिन कार्यक्रमास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, विशेष शाखेचे निरीक्षक संतोष पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर २ ते ८ जानेवारी दरम्यान सायबर पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, महिला तक्रार निवारण केंद्र, वाहतूक शाखा, बीडीडीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा विविध विभागाचे कक्ष लावण्यात आले असून विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी प्रदर्शनास भेट देवून पोलिसांचे कार्य कशा पध्दतीने चालते याची माहिती उत्सुकतेने करून घेतली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!