Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

थर्टी फस्टच्या आनंदावर काळाचा घाला , उद्योगपती अग्रवाल यांच्यासह ६ जणांचा मृत्यू , कॅप्सूल लिफ्ट तुटून झाला अपघात

Spread the love

थर्टी फस्टच्या पार्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या पातालपानी येथील फार्म हाऊसवर गेलेले मध्य प्रदेशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल यांच्या कुटुंबियांना झालेल्या अपघातात ६ जण ठार झाले आहेत. त्यांच्या फार्म हाऊसवरील टॉवरवर बसवलेल्या कॅप्सूल लिफ्टने सर्व खाली उतरत असताना लिफ्ट ७० फूट ऊंचीवरून खाली कोसळून झालेल्या अपघातात हे सर्व जण सर्व खाली फेकले गेले. या दुर्घटनेत उद्योगपती पुनीत (५३) ,मुलगी पलक (२७),  जावई पलकेश अग्रवाल (२८) , 3 वर्षीय नातू नव, मुंबईत राहणारे पलकेश यांचे ४० वर्षीय मेहुणे गौरव आणि ११ वर्षीय मुलगा आर्यवीर या सहा जणांचा मृत्यू झाला. गौरव यांची पत्नी निधी गंभीर जखमी आहे.  मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांला ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघाताविषयी महूचे  पोलीस अधीक्षक धर्मराज सिंह मीना  यांनी दिलेली माहिती अशी की, पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल आपली मुलगी आणि जावयासोबर फार्म हाऊसवर थर्टी फस्ट निमित्त  आले होते. सायंकाळचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी उद्योगपती पुनीत अग्रवाल यांच्यासह सात जण फार्म हाऊस परिसरात उभारण्यात आलेल्या टॉवरवर कॅप्सूल लिफ्टने गेले होते. मात्र, उतरताना लिफ्ट ७० फूट ऊंचीवरून जमिनीवर कोसळली. सर्व जण फुटबॉल सारखे खाली फेकली गेले. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. सगळ्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सने महू येथील मेवाडा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. नंतर सगळ्यांना चोइथराम हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. पुनीत अग्रवाल यांच्यासह मुलगी, जावयासह ६ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फार्म हाऊसचा चौकीदार कैलाश हा लिफ्ट रिमोटने ऑपरेट करत होता. घटना घडली तेव्हा पुनीत यांचा मुलगा निपुन हा टॉवरवरच थांबला होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. पुनीत अग्रवाल यांची सून गरोदर असल्याने ती घरी होती.

पुनीत अग्रवाल यांच्या जनसंपर्क दांडगा होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना आदरांजली म्हणून महू शहर बंद ठेवण्यात आले आहे. पुनीत अग्रवाल यांचा लाॅन टेनिसचे शौकीन होते. ते विंबलडन पाहण्यासाठी लंडनला जात होते. डेली कॉलेजमध्ये आयोजित मध्यप्रदेश स्टेट रॅंकिंग मेन डबल्स टेनिस स्पर्धेत ते सहभागी झाले होते. पातालपानी येथील आपल्या फॉर्म हाऊसमध्ये त्यांनी खास टेनिस कोर्ट देखील बनवले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!