Happy New Year : जाणून घ्या बँकांच्या नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्या

Advertisements
Advertisements
Spread the love

नव्या वर्षात  रिझर्व्ह बँकेने वर्ष २०२० मध्ये बँकेचे व्यवहार कोणत्यादिवशी बंद असणार याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Advertisements

प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) यांच्यासह काही सणांच्यादिवशी शासकीय तसेच खासगी बँकांचे व्यवहार बंद असतील. तर, विविध राज्यांमधील महत्त्वपूर्ण सणांच्या दिवशी देखील तेथील महत्वानुसार सुट्टी असते. जसे की, आसाममध्ये बिहूच्या दिवशी तर केरळात ओनमला बँका उघडणार नाहीत.

Advertisements
Advertisements

वर्ष २०२० मध्ये या दिवशी बँकांना आहे सुट्टी 

१ जानेवारी, बुधवार – (नववर्ष आरंभ दिन), १५ जानेवारी, बुधवार – (पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी), २६ जानेवारी, रविवार (प्रजासत्ताक दिन ), ३० जानेवारी, गुरूवार – (वसंत पंचमी), २१ फेब्रवारी, शुक्रवार – (महाशिवरात्र), १० मार्च, मंगळवार – (होळी), २५ मार्च, बुधवार- (उगादी, मध्यप्रदेश), २ एप्रिल, गुरूवार- (राम नवमी), ६ एप्रिल, सोमवार – (महावीर जयंती), १० एप्रिल, शुक्रवार – (गुड फ्रायडे), १४ एप्रिल, मंगळवार – (डॉ.आंबेडकर जयंती), १ मे, शुक्रवार – (महाराष्ट्र दिन, कामगार दिवस), ७ मे, गुरूवार – (बुद्ध पोर्णिमा), ३१ जुलै, शुक्रवार -(बकरी ईद), ३ ऑगस्ट, सोमवार – (रक्षाबंधन), ११ ऑगस्ट, मंगळवार – (जन्माष्टमी), १५, शनिवार ऑगस्ट- (स्वातंत्र्य दिन), ३० ऑगस्ट, रविवार – (मोहरम), २ ऑक्टोबर, शुक्रवार – (महात्मा गांधी जयंती), २६ ऑक्टोबर, मंगळवार – (विजयादशमी), ३० ऑक्टोबर, शुक्रवार – (ईद ए मिलाद), १४ नोव्हेंबर, शनिवार – (दिवाळी), १६ नोव्हेंबर, सोमवार – (भाऊबीज), ३० नोव्हेंबर सोमवार – (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर, शुक्रवार – (ख्रिसमस)

आपलं सरकार