Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नव्या वर्षात गॅस सिलेंडर महागले

Spread the love

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ होणार आहे. सलग चौथ्या महिन्यात गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामन्यांना मोठा दणका बसला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये विना अनुदानित गॅसच्या किंमतीत १९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

देशात वेगवेगळ्या शहरांमधील गॅस सिलिंडरच्या दरामध्ये फरक आहे. यात दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ७१४ रुपये तर कोलकात्यात ७४७ रुपये आहे. मुंबईत ६८४ रुपये ५० पैसे तर चेन्नईमध्ये याच सिलिंडरसाठी ७३४ रुपये मोजावे लागणार आहेत. १९ किलो सिलिंडर गॅसची किंमत दिल्लीत १२४१ रुपये इतकी आहे. कोलकात्यात १३०८ तर मुंबई आणि चेन्नईत अनुक्रमे ११९० आणि १३६३ रुपये इतकी आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीत एका सिलिंडरसाठी ६९५ रुपये द्यावे लागत होते तर मुंबईत सर्वात कमी ६६५ रुपये मोजावे लागत होते. आता पुन्हा दर वाढल्यानं सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या वर्षी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करून भेट दिली होती. तेव्हा विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती १२० रुपये ५० पैशांनी कमी केल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!