Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंबेडकरी अनुयायांसाठी भीमा कोरेगाव सज्ज , प्रशासनाकडून चोख व्यवस्था , प्रचंड गर्दीने भीमा कोरेगाव दुमदुमले !!

Spread the love

दोन वर्षांपूर्वी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भीमा कोरेगाव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी हजारोच्या संख्येने भीमा कोरेगावात दाखल होत आहेत. हि गारद लक्षात घेऊन अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

येथे दाखल झालेल्या नागरिकांना १०० टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ५०० फिरती स्वच्छतागृह असणार आहेत. १२ ओपीडी सेंटर्स, २० रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.१५ ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक विभाग,महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध आणि प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभाग याठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्यासाठी कार्यरत आहे.

या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली असून लाखो अनुयायांच्या गर्दीने भीमा कोरेगाव याही वर्षी फुलून गेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून बाबासाहेबांचे अनुयायी भीमा कोरेगावात दाखल होत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!