Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशभरात दाट धुके आणि थंडीची लाट , उत्तर प्रदेशात ६८ जणांचा मृत्यू , आसामात प्राणी संग्रहालयात लावले हिटर

Spread the love

देशात उत्तर भारतात थंडीची लाट आली असून दिल्ली-एनसीआरसह अनेक राज्यातील विविध ठिकाणी तापमान शून्याच्या खाली गेले आहे. हवामान विभागाने रविवारी देशातील आठ राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशात जबरदस्त थंडीची लाट आली आहे. या थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील थंडीमुळे एकट्या उत्तर प्रदेशात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १ ते ३ जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत लागोपाठ १६ व्या दिवशी थंडीचा कहर अद्यापही सुरूच आहे. गेल्या दशकभरापासून पहिल्यांदा प्रचंड थंडी अनुभवताना दिसत आहेत. दिल्लीने ११८ वर्षापूर्वीचा थंडीचा विक्रम मोडीत काढला आहे. १९०१ साली डिसेंबर महिन्यात अशीच थंडी उत्तर भारतात पडली होती. गेल्या आठवड्यापासून उत्तर भाारतात थंडीने कहर केला आहे. रविवारचा दिवस हवामान बदलामुळे थंडी थोडी कमी झाली होती. लोदी रोडवर तापमान २.८, पालममध्ये ३.२, सफदरजंगमध्ये ३.६ तर आया नगरमध्ये २.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पालममध्ये धुके पसरल्याने विमान उड्डाणाला फटका बसला. तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांनाही फटका बसल्याने अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.

उत्तर भारतातील अनेक शहरात आज सोमवारी सकाळी थंडीची हुडहुडी कायम होती. दिल्ली व एनसीआर परिसरात नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. धुक्यामुळे ३० रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. आसाममधील थंडीपासून प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांचा बचाव व्हावा म्हणून प्राणी संग्रहालय आणि गुवाहाटीच्यावनस्पती उद्यानात हिटर वाघ , सिंह आणि इतर प्राण्यांसाठी हिटरची व्यवस्था केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!