Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देत त्यांनी २०२० हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल, अशी प्रार्थना केली आहे.

मोदी यांनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, ‘२०२० हे वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि प्रत्येक देशवासी सक्षम, सबळ होईल अशी आशा करूया.’ मोदींनी हे ट्विट NaMo 2.0 या ट्विटर हँडलने केलेल्या एका ट्विटच्या उत्तरादाखल केले आहे. या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे, ज्यात मोदींच्या आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे.

दरम्यान, २०१९ या वर्षातील कडू-गोड आठवणींना उजाळा देत प्रत्येकजण सरत्या वर्षाकडे मोठ्या अपेक्षेने आणि नव्या उत्साहाने पाहत आहे. पुढील वर्ष २०२० असा एकदम क्रिकेटसारखा आकडा घेऊन येत असल्याने त्यावर आधारित मीम्सनादेखील उधाण आले होते. भारतासह जगभरात लोकांनी उत्साहात नववर्षाचे स्वागत केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!