Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नवे वर्ष आणि व्यापारी : जीएसटी रिटर्न फाईल न करणे पडू शकते महागात , खाते बंद होईल किंवा मालमत्ता बँक खात्याला जोडली जाईल

Spread the love

मोदी सरकारने कडक अंमलबजावणी करूनही सुमारे २० टक्के व्यावसायिक भरत नाहीत जीएसटी कर भरीत नसल्याची माहिती असून नव्या वर्षात जीएसटीचे नियम अधिक कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे  ठरलेल्या वेळेत जीएसटी रिटर्न भरले नाही तर  महागात पाडण्याचीही शक्यता आहे. एखाद्या व्यापाऱ्याने जर जीएसटी रिटर्न दाखल केले नाहीत तर बँक अधिकारी त्यांची  मालमत्ता बँक खात्याला जोडू शकतात. एका मीडिया रिपोर्टनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम या विभागाने जीएसटी  पेमेंट्सबद्दल एक स्टँडर्ट ऑपरेटिंग प्रोसेस म्हणजे एक ठराविक यंत्रणा तयार केली आहे.

बिझनेस लाइनच्या रिपोर्टनुसार, व्यावसायिकांनी त्यांचा जीएसटी रिटर्न  भरला नाही तर त्यांची बँक खाती जप्त होऊ शकतात किंवा त्यांची नोंदणी रद्द होऊ शकते. व्यावसायिकांनी दर महिन्याला किंवा ३ महिन्यांनंतर जीएसटी रिटर्न भरायचा आहे पण २० टक्के व्यावसायिक जीएसटी रिटर्न भरत नाहीत. त्याचा महसुलावर परिणाम होतो.

व्यावसायिकांनी ठरलेल्या तारखेपर्यंत जीएसटी रिटर्न भरले नाहीत तर त्यांना सिस्टिम जनरेटेड नोटीस पाठवली जाईल. तुम्ही जर ५ दिवसांत पैसे भरले नाहीत तर त्यानंतर तुम्हाला नोटीस पाठवली जाईल. यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाईल. जर १५ दिवसांत तुम्ही पेमेंट केलं नाही तर तुमचं रेकॉर्ड चेक केलं जाईल. त्या त्या व्यावसायिकांना आपली बाजू मांडण्याचीही संधी दिली जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!