Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

झारखंड : हेमंत सोरेन यांच्या शपथविधीच्या निमित्ताने एकत्र येणार विरोधी पक्षांचे नेते

Spread the love

महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलाच्या पाठोपाठ झारखंड विधानसभेतही भाजपची पीछेहाट झाल्यामुळे विरोधी पक्षात समाधानाचे वातावरण असून पुन्हा एकदा भाजप, मोदी आणि शहा यांच्या विरोधात एकजूट निर्मण करण्याचा प्रयत्न झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या शपथविधीच्या निमिताने होत असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे. उद्या हा शपथविधी पार पडणार असून या शपथविधीसाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हजेरी लावून भाजपविरोधी सरकारला आपल्या शुभेच्छा देणार आहेत.

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या महाआघाडीला चांगले यश मिळाले आहे. २९ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. रांची मध्ये शपथविधी सोहळा पार पडणार असून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून यानिमित्ताने विरोधी पक्ष आपले शक्तीप्रदर्शन दाखवणार आहे.

दरम्यान हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला प्रणब मुखर्जी, माजी राष्ट्रपती, भारत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पी चिदंबरम, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस, अहमद पटेल, नेते, काँग्रेस, प्रियंका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस, अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, यूपी, तेजस्वी यादव, माजी उपमुख्यमंत्री, बिहार,  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल, अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान, कमलनाथ, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश, भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, शरद यादव, माजी खासदार, राज्यसभा,  एम. के. स्टॅलिन, अध्यक्ष, डीएमके,  मायावती, माजी मुख्यमंत्री, यूपी, एच.डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक, अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली, हरिवंश, उप सभापति, राज्य सभा, कन्हैया कुमार, सीपीआय युवा नेता,  के सी वेनुगोपाल, नेते, काँग्रेस, आरपीएन सिंह, झारखंड प्रभारी, काँग्रेस, उमंग सिंघार, नेते, काँग्रेस, चंद्रबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश,  टीआर बालू, खासदार, खा. कनी मोळी, खासदार, डीएमके, अब्दूल बारी सिद्दिकी, माजी मंत्री, बिहार सरकार, हरीश रावत, माजी मुख्यमंत्री, उत्तराखंड, निरंजन पटनायक, प्रदेश अध्यक्ष, ओडिशा काँग्रेस यांची उपस्थिती राहील असे सांगण्यात येत आहे. अनेकांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!