Crime News Update : १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार , तर दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलाचा विवाहितेवर बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

वाशिमच्या मालेगावमध्ये एका विकृत तरुणाने आपल्या साथीदारासह एका १३ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घृणास्पद घटना मालेगाव शहरात घडली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध अपहरण, पोस्कोसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Advertisements

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि , वॉशिंच्या मालेगाव शहरातील एक १३ वर्षीय मुलगा बुधवारी सायंकाळी बाजारातून चिकन आण्यासाठी गेला होता. तेव्हा बाजारातील चिकन विक्रीचा व्यवसाय करणारा  सज्जू चौधरी हा त्याच्या एका साथीदारांसह त्या मुलाच्या मागे  मोटारसायकल घेऊन आला. त्यानंतर त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले आणि भेरा रस्त्यावरील निर्जन स्थळी एका शेतात घेऊन गेले. तेथे सज्जू चौधरी आणि त्याचा साथीदार अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी बळजबरी करत असतांना हा मुलगा ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून त्या शेतातील एक म्हातारी आजी धावून आली. आजीने जोरात आरडाओरडा केल्यानंतर सज्जू चौधरी आणि त्याचा साथीदार मोटारसायकलवरून  पसार झाले. त्यांनतर त्या आजीने त्या मुलाला शहरात आणून सोडले.

Advertisements
Advertisements

सदर घृणास्पद प्रकाराची माहिती पीडित मुलाने आई वडिलांना दिल्यानंतर त्यांनी आरोपींविरुद्ध मालेगांव पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मालेगांव पोलिसांनी सज्जू चौधरी आणि त्याच्या साथीदारावर अपहरण, पोस्को आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले असून आरोपी फरार झाले आहेत. या अगोदरही सज्जू चौधरी हा त्या मुलावर वाईट नजर ठेवून अश्लील बोलत असल्याचे  त्या मुलाने सांगितले .

पुढील तपास ठाणेदार आधारसिंह सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ आणि गजानन झगरे,संदीप निखाडे,कुलदीप ताजने हे पोलीस कर्मचारी करत असून आरोपीला शोधण्यासाठी पथकं पाठविण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलाकडून विवाहितेवर बलात्कार 

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटनासुद्धा याच मालेगांव शहरात घडली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालेगांव शहरातील एकाच आठवड्यातील दुष्कृत्याच्या दोन घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मालेगांव  शहरातील एका ३० वर्षीय विवाहित महिलेच्या भावाला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या १७ वर्षीय मुलाने २१ डिसेंबर रोजी परिसरातील  स्वच्छतागृहात या पीडितेवर अत्याचार केले होते. त्यानंतर या मुलाने पीडितेला हा प्रकार कुठे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान या घटनेने  भयभीत झालेल्या महिलेनं अखेर हिंमत करून पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली. पीडित महिलेने मालेगांव पोलिसांत तक्रार दिल्यानंतर केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आपलं सरकार