Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabd Crime : ५० लाखांचे प्लाॅट ५ लाखात विक्रीचा प्रयत्न , तीन अटकेत, एक फरार

Spread the love

औरंगाबाद – पडेगाव परिसरातील१०लाख रुपयांचा प्रत्येक प्लाॅट केवळ १ लाख रुपये अशा दराने ५ प्लाॅट विकण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन भामट्यांना गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या.यातील चौथा आरोपी फरार झाला आहे.या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र दिनकर कुलकर्णी(४८) रा. सारा वैभव सोसायटी जटवाडा रोड, फरीदखान (२८) रा.अल्मेरा शाळेजवळ रोशनगेट आणि शेख आमेर शेख अल्ताफ रा. फाजलपुरा अशी अटक आरोपींची नावे आहेत.
खुल्ताबाद येथील रहिवासी मुजीबखान सरदारखान पठाण(३८) धंदा शेती यांना औरंगाबादेतील पडेगाव परिसरात घर बांधण्यासाठी प्लाॅट खरेदी करावयाचा होता.म्हणून ते प्लाॅट बघण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी आरोपी फरीदखान ने मुजीबखान यांना १लाख रु. एक असै पाच प्लाॅट दाखवले व हे प्लाॅट फरीदखानचा मित्र शेख आमेर शेख अल्ताफ यांचे असल्याचे सांगून त्या पैकी २४ डिसैंबर रोजी १लाख रु. टोकन घेतले.पण मुजीबखान यांना या भागात प्लाॅट चे दर खूप जास्त असल्याची माहिती मिळाली .व फरीदखान आणि शेख आमेर फसवणूक करत असल्याचे जाणवले.म्हणून मुजीबखान यांनी टोकन दिलेले १लाख रु. परंत मागितले. पण आरोपी पैशे देण्यास तयार नव्हते व प्लाॅटचे खरेदीखंत तयार करण्यास जबरदस्ती करंत होते.म्हणून मुजीबखान यांनी गुन्हेशाखेकडे गुरुवारी तक्रार अर्ज दिला.त्यानुसार पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी एपीआय गौतम वावळे यांना शुक्रवारी दुपारी रजिस्र्टी कार्यालयात ट्रॅप लावण्यास सांगितले. त्यानुसार खरेदीखत तयार झाल्यानंतर मुजीबखान यांना आरोपी पैशे मागंत असतांना पोलिसांनी दोघांच्या मुस्क्या आवळल्या.तर या प्लाॅटचे बनावट दस्तऐवज तयार करणारा नरेंद्र कुलकर्णी यालाही पोलिसांनी अटक केली. हे सर्व बनावट दस्ताऐवज तयार करणारा रजिस्र्टी कार्यालयातील मो.मुमताजोद्दीन हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.

वरील कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गौतम वावळे, अजबसिंग जारवाल पोलिस कर्मचारी शिवाजी झिने, चंद्रकांत गवळी, सतीष जाधव, प्रकाश चव्हाण यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!